महाराष्ट्रासाठी परदेशातून २५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत, ना.शंकरराव गडाख यांनी मानले आभार

 

महाराष्ट्रासाठी परदेशातून २५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत, ना.शंकरराव गडाख यांनी मानले आभारनगर : राज्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आढळत असल्याने अनेकांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेने अनेक संस्थांनी मदत केली असून त्यात 250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची पहिली बॅच विमानाद्वारे सिंगापूरहून रवाना झाली आहे, अशी माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या काळात ही यंत्रे महाराष्ट्रासाठी देण्यात आली आहेत. याकामी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून मदत केल्याबद्दल टेमासेक फाऊंडेशन सिंगापूर, ऑल कार्गो प्रायव्हेट लिमिटेड, रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज यांचे सरकारच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया ना.गडाख यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post