करोनामुक्त! इस्त्रायल ठरला जगातील पहिला देश, मास्कचे बंधन घेतले मागे

 

इस्त्रायल ठरला जगातील पहिला देश, मास्कचे बंधन घेतले मागेभारतात करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या तुलनेत इतर देशांमध्ये स्थिती नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. इस्रायलनं तर आता सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या शाळांमध्ये मास्क बंधनकारक नसेल असं जाहीर केलं आहे. लसीकरणाच्या जोरावर इस्रायलने हे करुन दाखवलं आहे.

इस्राईलमध्ये लसीकरणाच्या जोरावर करोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यात आला आहे. त्यामुळे इस्राईलमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक नसेल. मात्र बंदिस्त ठिकाणी आणि गर्दी होण्याऱ्या कार्यक्रमात मास्क घालणं बंधनकारक असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच शिक्षण संस्थाही पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर खुल्या शाळांमध्ये मास्क घालण्यास कोणतंही बंधन नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच विदेशी पर्यटकांचं येत्या मे महिन्यापासून लसीकरण करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post