राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई मालपाणी यांचे निधन

 

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या निर्मलाताई मालपाणी यांचे निधननगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा राहुरी खुर्द गावच्या  सरपंच निर्मलाताई मालपाणी यांचे दुःखद निधन झाले. मालपाणी या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणुन परिचित होत्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व महिलांचं प्रभावी संघटन करण्यात त्यांनी नेहमीच योगदान दिले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मालपाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 


मालपाणी यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक संस्थांवर, विविध पदांवर काम केले.

उपाध्यक्षा : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस, मुंबई 

संस्थापक चेअरमन : अहमदनगर जिल्हा महिला विकास सह. पत. मर्या., नगर 

व्हा. चेअरमन : महाराष्ट्र राज्य महिला विकास पतसंस्था फेडरेशन, पुणे 

समन्वयक : यशश्विनी सामाजिक अभियान विभागीय, उत्तर महाराष्ट्र 

चेअरमन :  नगर जिल्हा महिला सहकारी औद्योगिक संघ मर्यादित फेडरेशन

अध्यक्षा : निर्मल महिला व बालकल्याण प्रतिष्ठान, रहुरी 

माजी सरपंच : राहरी खुर्द ग्रामपंचायत, 

विशेष कार्यकारी दंडाधिकारी (महाराष्ट्र राज्य)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post