नगरजवळील 'या' गावात १० दिवसांचा लॉकडाऊन

 निंबळक येथे दहा दिवस लॉकडाऊन, सकाळी ८ते १२ दुकाने खुलीनगर -कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन निंबळक येथील ग्राम सुरक्षा समितीने १४ तारखेपर्यत लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे . सकाळी ८ते १२ वाजेपर्यतच दुकाने उघडी राहणार आहे . त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे अशी माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली .

निंबळक ( ता. नगर ) भागात कोरोना रुग्णाची संख्या दिवसो दिवस वाढत आहेत . गावाजवळच एमआयडीसी असल्याने कामावर जाणाच्या कामगार वर्गाची संख्या जास्त आहे . गावामधुन परीसरातील सहा ते सात गावा मधून नागरिकाची निंबळक मार्ग रहदारी चालू असते .कंपनीतून  सुटल्या नंतर कामगार भाजी पाला, किराणा  तसेच इतर साहित्य घेण्यासाठी येथील मुख्य चौकात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे . बहुतेक नागरिक मास्क न वापरता फिरत आहे . यामुळे कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे . यावर नियत्रंण आणण्यासाठी  जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक घेण्यात आली . सकाळी ८ ते१२ वेळेत दुकाने उघडे राहतील .नंतर दवाखाना , मेडीकल, व दुध डेअरी फक्त उघडे राहतील . समिती गावावर लक्ष असणार विनाकारण फिरणारे तसेच विना मास्क फिरणाऱ्या ला शंभर रूपये दंड करण्यात येणार आहे . गावात ज्या भागात कोरोना चे रुग्ण सापडले तो परीसर दहा दिवसासाठी बंद केला आहे . यावेळी उपसरपंच बाळासाहेब कोतकर , घनश्याम म्हस्के , भाऊराव गायकवाड सोमनाथ खांदवे , समीर पटेल , तलाठी , आरोग्य कर्मचारी उपस्थित होते  .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post