करोना प्रतिबंधक नवीन नियमावली जाहीर, काय बंद, काय सुरु... वाचा सविस्तर

 

करोना प्रतिबंधक नवीन नियमावली जाहीर, काय बंद, काय सुरु... वाचा सविस्तरनगर -फौजदारी प्रक्रिया संहिता कलम - १४४ ची अंमलबजावणी व रात्रीची संचारबंदी

अ) सोमवार ते शुक्रवार : सकाळी ७ ते सायंकाळी ८ वा. या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांनी

सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये.

ब) सोमवार ते शुक्रवार : रात्री ०८.०० ते सकाळी ०७.०० व शुक्रवारी रात्री ०८.०० ते सोमवारी

सकाळी ०७.०० या कालावधीत संचारबंदी.

सोमवार ते शुक्रवार सकाळी ०७.०० ते सायं. ०८.०० या कालावधीत चालु असलेली दुकाने

१) किराणा दुकाने / धान्य दुकाने

२) भाजीपाला दुकाने / फळ दुकाने

३) डेअरी / दुग्ध व दुग्धजन्य पदार्थाची दुकाने

४) बेकरी, स्वीट मार्ट, अन्नपदार्थाचे हातगाडे, धाबे, हॉटेल, रेस्टॉरंट (फक्त पार्सल सेवेसाठी)

५) मेडिकल, सर्जीकल, पॅथोलॉजी लॅब व वैद्यकीय सेवा.

६) कृषी सेवा केंद्र, शेती पुरक व्यवसाय

७) मटन, चिकन अंडी (मांस विक्री तत्सम)

८) अत्यावश्यक सेवेतील L.P.G. Gas, पेट्रोल, डिझेल पंप.

या व्यतिरिक्त इतर सर्व आस्थापना पुढील शासन आदेशापर्यत बंद राहतील.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post