करोना विरूद्धच्या लढाईत 'नेजल स्प्रे'ठरणार गेमचेंचर!

करोना विरूद्धच्या लढाईत 'नेजल स्प्रे'ठरणार गेमचेंचर! टोरोंटो : कोरोनाव्हायरस विरुद्ध लढण्यासाठी नाकाद्वारे घेण्यात येणारा नेजल स्प्रे (Nasal Spray) एकदम प्रभावी ठरु शकतो. कॅनेडियन कंपनी सॅनोटाईझने  तसा दावा केला आहे. नाकाद्वारे स्प्रे दिला जातो, ज्यामुळे कोरोना विषाणूचे 99.99 टक्के नष्ट होण्यास मदत होते. कंपनीचे म्हणणे आहे की, नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या स्प्रेमुळे केवळ संसर्ग रोखता येणार नाही तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण त्वरीत बरे होतील आणि लक्षणे तीव्र होण्यापासून प्रतिबंध होईल, असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.

'द सन' या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, सॅनोटाइझ  कंपनीने म्हटले आहे, अमेरिका आणि यूकेमधील   चाचण्यांच्या निकालांवरून असे दिसून आले की  नेजल स्प्रेने हवेतील कोरोनाव्हायरस नष्ट करण्यास सुरुवात केली आणि नाकाद्वारे हा स्प्रे घेतल्यानंतर कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंधित करतो. कंपनीचा असा दावा आहे की पहिल्या 24 तासांत स्प्रे चाचणी दरम्यान ज्यांनी त्याचा वापर केला त्यांच्या शरीरातून व्हायरलमध्ये 1.362 घट झाली आहे. म्हणजेच, एका दिवसात व्हायरसची संख्या 95 टक्क्यांनी घटली, जी पुढच्या 72 तासांत 99 टक्क्यांपर्यंत वाढली. म्हणजे या स्प्रेचा प्रभाव चांगला दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post