नगरसेवक निधी रोख करून कोवीड रूग्‍णांच्‍या उपचारासाठी वापरावा

 नगरसेवक निधी रोख करून कोवीड रूग्‍णांच्‍या उपचारासाठी वापरावा  माजी स्‍थायी समितीचे सभापती सचिन जाधव

 


      गेल्‍या 1 वर्षापासून कोरोना संसर्ग विषाणूचे संकट मोठया प्रमाणात वाढत असल्‍यामुळे नागरिकांच्‍या आरोग्‍यावर विपरीत परिणाम होत आहे. मनपा हद्दीत देखील रूग्‍णांची संख्‍या दररोज झपाटयाने वाढत असताना नागरिकांचे आरोग्‍य आबादीत राहण्‍यासाठी निधीची आवश्‍यकता असते यासाठी नगरसेवक निधी रोख करून कोवीड रूग्‍णांसाठी नगरसेवकांनी सुचविलेल्‍या कामांसाठी वापरण्‍यात यावी अशी मागणी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे व मा.आयुक्‍त श्री.शंकर गोरे यांच्‍याकडे माजी स्‍थायी समितीचे सभापती मा.श्री.सचिन जाधव व माजी उपमहापौर मा.श्री.अनिल बोरूडे यांनी केली.

      निवेदनात पुढे म्‍हणाले आहे की, कोरोना विषाणूपासून कोणताही धोका होवू नये यासाठी मनपा स्‍तरावर प्रयत्‍न सुरू आहेत. शासनाकडून येणा-या अटी शर्तीचे पालनही नागरिकांनी करणे गरजेचे आहे. कोरोना रूग्‍णांवर उपाय योजना करण्‍यासाठी निधीची आवश्‍यकता भासत आहे. यासाठी निधीची कमतरता भासू नये कोणत्‍याही रूग्‍णांच्‍या जिवीतास हानी होवू नये याकरिता सन 2021-2022 च्‍या आर्थिक वर्षातील नगर‍सेवकांना देण्‍यात येणारा नगरसेवक निधी वापरावा. विकास कामे होणारच आहे. नागरिकांच्‍या आरोग्‍याचा प्रश्‍न सध्‍या महत्‍वाचा असून तो सुटावा असे ते म्‍हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post