माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन

 माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले गांधी कुटुंबियांचे सांत्वन

नगर : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नगरमध्ये दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट देऊन गांधी कुटुंबियांचे सांत्वन केले. ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले होते.  पंकजा मुंडे यांनी गांधी यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. समवेत खा. डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, डॉ. गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post