लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंडला भेटायला कसा जाऊ? पोलिसांकडून भन्नाट उत्तर

 लॉकडाऊनमध्ये गर्लफ्रेंडला भेटायला कसा जाऊ? पोलिसांकडून भन्नाट उत्तरमुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना गाडीला एक खास स्टिकर लावण्याचं आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलंय. मुंबई पोलिसांनी यासाठी खास 3 रंगाचे स्टिकर सांगितले आहेत. त्यावरुन एका पठ्ठ्यानं मुंबई पोलिसांना ट्विटरवरुन एक प्रश्न विचारलाय. त्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनीही भन्नाट उत्तर दिलंय. 

गर्लफ्रेन्डची आठवण येतेय. तिला भेटायला जाण्यासाठी कुठले स्टिकर वापरु? असा प्रश्न एका तरुणाने मुंबई पोलिसांना ट्विटरवरुन विचारला आहे. त्यावर मुंबई पोलिसांनीही भन्नाट उत्तर दिलं आहे. तुमच्यासाठी भेट घेणं आवश्यक असलं तरी ते आमच्या अत्यावश्यक सेवेच्या यादीत येत नाही. हा दुरावा तुमच्यातील प्रेम वाढवेल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. तसंच हा फेज संपल्यानंतर तुम्ही आयुष्यभर सोबत असाल, अशा शुभेच्छाही मुंबई पोलिसांनी त्या तरुणाला दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post