गर्दी कमी झाली आणि लाटही ओसरण्यास सुरूवात


गर्दी कमी झाली आणि लाटही ओसरण्यास सुरूवात मुंबई,  : राज्याची राजधानी असलेल्या मुंबई नगरीला कोरोनाने विळखा घातला आहे. पण, आता मुंबईनगरीत दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे. मुंबईत गेल्या पाच दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे.

मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबईतील 4 तारखेपासून ते आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी दिली आहे.  4 एप्रिल रोजी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 11,163 वर होती. तर आज 25 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 5542 वर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची लाट ओसरत असल्याचे चिन्ह आहे.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णांची संख्या ही वाढत गेली होती. 15 तारखेनंतर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर मुंबईतील बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणावरील गर्दी ही ओसरत गेली. अखेरीस याचा फायदा आता समोर दिसत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post