खा.विखे यांच्यावर कारवाईची मागणी...रेमडेसिवीरचा इतका मोठा साठा कसा आणला, नेमका कुठं वापरला?

 खा.विखे यांच्यावर कारवाईची मागणी...रेमडेसिवीरचा इतका मोठा साठा कसा आणला, नेमका कुठं वापरला?नगर- अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला.  या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेम्डेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. सदर साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थान च्या रुग्णालयाला व राहता येथील सरकारी दवाखान्याला देखील देखील वाटप केले. 

१०,००० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ सुजय विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी  केली असावी,  सदर  रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब देखील कुठे नाही अश्या मुद्यांवर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ऍड सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात खासदार डॉ सुजय विखे यांचावर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.

आज दि. २६.०४. २०२१ रोजी, यांनी  सदर  रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा तत्काळ शासनाने जप्त करावा व अहमदनगर जिह्यातील गरजू रुग्णांना जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्या मार्फत समन्याय पद्धतीने वाटप करावी अशी विनंती याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आली. मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. आर. व्ही घुगे व मा. न्या. बी यु देबडवार यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला अशा परिस्तिथीत जी कायदेशीर कार्यवाही करता अली असती तशी कार्यवाही करण्याचे आदेश दिली. पुढील सुनावणी २९. ०४. २०२१ रोजी ठेवण्यात अली आहे. 

सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड प्रज्ञा तळेकर, ऍड अजिंक्य काळे व ऍड राजेश मेवारा यांनी काम पाहात आहे तर शासनाच्या वतीने ऍड डी आर काळे   काम पाहात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post