खा.विखे यांच्या पारनेर तालुक्यातील कोविड केअर सेंटरला भेटी

 खा.विखे यांच्या पारनेर तालुक्यातील कोविड केअर सेंटरला भेटीखा. सुजय विखे पाटील यांनी आज पारनेर तालुक्यातील भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, कार्जुले हर्या, पिंपळगाव रोठा, पारनेर शहर येथे कोविड सेंटरला भेट देऊन कोरोना योद्ध्यांशी संवाद साधला आणि तेथील परिस्थितीची पाहणी केली.

तसेच चोंभूत येथे जि. प. शाळेत बनविण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन या दौऱ्यादरम्यान केले आणि वाढत्या कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील यावेळी केले.

याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती  गणेश शेळके, जि. प. माजी उपाध्यक्ष  सुजीत झावरे, भाजपचे तालुका अध्यक्ष  वसंतराव चेडे,  राहुल शिंदे, शिवसेना तालुका अध्यक्ष  बंडू रोहकले,  अरुण रोहकले, भाजपचे  तुषार पवार, तहसीलदार सौ. ज्योती देवरे, गटविकास अधिकारी  माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, सह कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post