आढावा बैठकीत खासदारांवर शाई फेकण्याचा प्रयत्न


आढावा बैठकीत खासदारांवर शाई फेकण्याचा प्रयत्न नगर -  नेवासा येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने बैठकीत गोंधळ उडाला.

नेवासामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत वंचीत बहूजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला. तालुक्यात करोना संकटाला तोंड देण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याच्या कारणावरून शाई फेकण्याचा प्रकार घडलेला आहे.

शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात चालू असलेल्या बैठकीत हा गोंधळ उडाला. तत्काळ पोलिसांनी या वेळी हस्तक्षेप केला. काही वेळानंतर संजय सुखदान यांना सविस्तर चर्चा करण्यासाठी मिटिंगमध्ये बोलावून सुखदान यांचे म्हणणे खासदार लोखंडे यांनी ऐकून घेतले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post