करोना रुग्णांच्या नातेवाईकांना आ.संग्राम जगताप यांचा मोठा दिलासा... दोन वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था

 करोना रुग्णांच्या नातेवाईकांना आ.संग्राम जगताप यांचा मोठा दिलासा... दोन वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्थानगर- करोना रूग्णसंख्या वेगाने वाढल्याने रूग्णांच्या नातेवाईकांचीही प्रचंड धावपळ होत आहे. रूग्णाला ॲडमीट केल्यानंतर नातेवाईकांचे जेवणाचे हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन आ.संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून टिम 57 फॅमिली पान पक्वानने  नगर शहरात करोना रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोफत भोजन पोहोच सेवा सुरू केली आहे. रूग्णाचे नातेवाईक जिथे असतील तिथे हि टिम रोज दोन वेळचे जेवण मोफत पुरवणार आहे. 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनच्या काळात ही सेवा चालू राहणार आहे. यात प्रत्येक डब्यात 3 चपाती, भात वरण, भाजी असेल. या मोफत भोजन सेवेसाठी करोना रूग्णाच्या नातेवाईकांनी सकाळी 09 ते 11 यावेळेत नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post