उत्तरेत गुढी उभारली...खा. सुजय विखे यांना कर्मभूमीचा विसर... मनसेची बोचरी टीका

 खासदार सुजय विखे यांना कर्मभूमीचा विसर... मनसेची बोचरी टीकानगर- खा.डॉ.सुजय विखे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त शिर्डीतील कोविड केअर सेंटरमध्ये गुढी उभारून रूग्णांना विश्वास दिला. मात्र खा.विखे यांनी उत्तर नगर जिल्ह्यात दिलासा देताना आपल्या नगर दक्षिण मतदारसंघाकडे करोना काळात दुर्लक्ष केले आहे अशी टीका मनसे विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा यांनी फेसबुक पोस्ट द्वारे केली आहे. खासदारांना कर्मभूमीचा विसर पडला अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

सुमित वर्मा यांनी म्हटलं आहे की,

खासदारांना कर्मभुमीचा विसर

वाह , इथं ज्यांनी मतं देऊन निवडून आणले अश्या मतदारांना वाऱ्यावर सोडून आमचे दक्षिणेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे यांनी उत्तरेत बरोबर गुढी उभारली ..इथं मरमर करताय लोकं त्यांना बेड मिळेना , इंजेक्शन मिळेना , काळाबाजार जोरात चालू पण खासदारांना याचा विसर पडला . मतदार संघात लोकांना बळ देण्याचे काम करायला हवं पण खासदार साहेबांना शेवटी घराकडे ओढ लागलेली . जाहीर निषेध या असंवेदनशीलतेचा .

सुमित संतोष वर्मा

जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

अ.नगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post