आ.मोनिका राजळे यांनी केली कोविड रूग्णांची विचारपूस

 आ.मोनिका राजळे यांनी केली कोविड रूग्णांची विचारपूसनगर-आज तहसील कार्यालय पाथर्डी येथे शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली.  पाथर्डी येथील  डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय  वस्तीगृह व नवजीवन वस्तीगृह येथील कोवीड केअर सेंटरला (ccc) भेट दिली. 

यावेळी बैठकीस नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनागराध्य श्री नंदकुमार शेळके, प्रांत श्री देवदत्त केकाण साहेब, तहसीलदार श्री घनश्याम वाडकर साहेब, मुख्याधिकारी श्री धनंजय कोळेकर,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, पोलीस निरीक्षक श्री जोंधळे साहेब, उपजिल्हा रुग्णालयचे डॉ अशोक कराळे, श्री पंकज नेवसे साहेब, गट विकास अधिकारी शीतल खिंडे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ जगदीश पालवे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post