आम्ही काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतो का? आ. सुरेश धसांचा हल्लाबोल

 रेमिडिसीव्हर न मिळायला आम्ही काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतो का? सुरेश धसांचा हल्लाबोल
बीड: जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन व प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करून प्रत्येक कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यावी या मागणीसाठी आज बीड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ. सुरेश धस,आ. लक्ष्मण पवार, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हा अधिकारी मा. रविंद्र जगताप याची भेट घेतली. आरोग्य यंत्रणेतील गलथान कारभार, रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार यामुळे जनता भयभीत व हवादिल आहे. प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे बाबत आवाहन करण्यात आले. या गंभीर समस्ये बाबत आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे गटनेते फारूक पटेल नगरसेवक तथा कोरोना योध्दा अमर नाईकवाडे, शांतीनाथ डोरले आदी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post