राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेे उतरले मैदानात, जिल्हा रुग्णालयाला भेट

 

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची जिल्हा रुग्णालयाला भेट, उपचार सुविधांचा घेतला आढावा
नगर: नगर जिल्ह्यातील करोना परिस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज नगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देऊन आढावा घेतला.मोठया प्रमाणात वाढलेली रुग्णसंख्या, डॉक्टर्स व इतर कर्मचारी वर्गात देखील झालेली कोरोनाची लागण, ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे यंत्रणेवर मोठा ताण आहे. तरी देखील उपलब्ध साधने व मनुष्यबळाचा वापर करून रुग्णांना योग्य सेवा देण्याची सुचना त्यांनी केली.ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत ना. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली. या कठीण काळात नागरिकांना हात जोडून विनंती आहे की आपण कृपया करोनासंदर्भातील सर्व शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post