कायदा मोडणाऱ्यांची गय करू नका



 महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब यांनी आज अहमदनगर जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. कडक निर्बंध घालून दिलेले असले तरी, काही ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नाही. अजूनही लोक रस्त्यावर दिसत आहे, कायदा मोडणाऱ्यांची गय करू नका, अशा सूचना यावेळी दिल्या.

बाधित रुग्णांसाठीची होम क्वारंटाइन/होम आयसोलेशन पद्धतीचा आढावा घेण्याची वेळ आली आहे, सर्व रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाइन केले पाहिजे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लक्षणे असणाऱ्यांचे विलगीकरण करा, संगमनेरमध्ये याचा चांगला परिणाम झाला, बधितांची संख्या घटते आहे. बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यास केवळ रुग्ण बरा होऊ शकतो, त्याला पुढे ऑक्सिजन, इंजेक्शन याची आवश्यकता भासणार नाही.

जिल्हा नियोजन मंडळातून नगरचे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कर्जत, पाथर्डी, संगमनेर व श्रीरामपूर येथे दररोज 250 जम्बो सिलिंडर क्षमतेचे ऑक्सिजन उत्पादन केंद्र उभारण्यात येत आहे, त्यामुळे जिल्ह्याला अधिक दिलासा मिळेल. जिल्हा नियोजन मंडळ, आमदार निधीतून 100 पोर्टेबल ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन जिल्ह्यातील  सर्व ग्रामीण रुग्णालयाला पुरवठा करण्याच्याही सूचना यावेळी दिल्या. महापालिका हद्दीत रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यादृष्टीने निर्बंध अधिक कडक करणे अत्यावश्यक आहे.

या संकटाचा बोध घेऊन पुण्यातील ससून आणि औरंगाबादच्या घाटी रूग्णालयाच्या धर्तीवर अहमदनगर शहरात मोठे रूग्णालय उभारण्याच्या दृष्टीने अभ्यास करून शासनास प्रस्ताव करण्याची सूचना जिल्हाधिका-यांना दिली.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post