महाराष्ट्रात मोफत लसीकरण! १ मे रोजी अधिकृत घोषणा शक्य

 

महाराष्ट्रात मोफत लसीकरण! १ मे रोजी अधिकृत घोषणा शक्यमुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार असल्याची माहिती अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी दिली. तर, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सुरूवातीला मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे ट्विट केले होते. मात्र, नंतर ते डिलिट करत लसीकरणाबाबत उच्चाधिकार समितीच अधिकृत घोषणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरसकट मोफत लसीकरण होणार की, काही घटकांना लसीसाठी पैसे मोजावे लागणार, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी लसीकरणाबद्दलची अधिकृत घोषणा होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post