शेतकऱ्यांना हवामान अंदाज व पीक सल्ला देणारे केंद्राचे मेघदूत ॲप

शेतकऱ्यांना हवामान अंदाज व पीक सल्ला देणारे केंद्राचे मेघदूत ॲप मुंबई: गेल्या काही वर्षापासून पावसाची अनियमितता वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तर वर्षातील 12 महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात पाऊस पडल्याची उदाहरण आहेत. त्यामुळे अवकाळी पावसानं शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे.  शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान कमी होऊ शकतं. हा विचार करुन भारतीय कृषी विभाग आणि भारतीय हवामान विभागनं मेघदूत हे अ‌ॅप तयार केलं आहे. 

शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आणि त्या आधारीत पीक सल्ला देण्याचं काम मेघदूत अ‌ॅपमधून केलं जाते. शेतकऱ्यांना मेघदूत अ‌ॅपद्वारे वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आर्द्रता, तापमान आणि पावसाच्या अंदाजाची माहिती दिली जाते. याशिवाय अ‌ॅपद्वारे पिकाची माहिती दिली जाते. हे अ‌ॅप दर मंगळवारी आणि शुक्रवारी अपडेट केलं जातं.

मेघदूत अ‌ॅप भारतातील 10 प्रादेशिक भाषांमध्ये वापरता येते. भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र आणि भारतीय कृषी परिषदेकडून हे अ‌ॅप विकसित करण्यात आलं आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, ओडिया, बंगाली , कन्नड आदी मराठी भाषांमध्ये वापरता येते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post