अमरधाममध्ये जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील मयतांवरही अंत्यसंस्कार, नगरकरांनी घाबरून जाऊ नये

 अमरधाममध्ये जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील मयतांवरही अंत्यसंस्कार, आकडे पाहून नगरकरांनी घाबरून जाऊ नये - महापौर बाबासाहेब वाकळेनगर -  कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्‍यामुळे नगर जिल्‍हयामध्‍ये मोठया प्रमाणात रूग्‍णसंख्‍या ही वाढत आहे. नगर शहर हे मुख्‍यालयाचे ठिकाण असल्‍यामुळे जिल्‍हयासह बीड जिल्‍हयातील अतिसंवेदनशिल कोरोना रूग्‍ण उपचार घेण्‍यासाठी  नगर शहरामध्‍ये येत असतात. दुदैवाने काहींचा मृत्‍यू होत आहे. त्‍यामुळे कोरोना रूग्‍णावर नगर शहरामध्‍ये अंत्‍यविधी होत असल्‍यामुळे शहरातील नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण पसरले आहे. तरी शहरातील नागरिकांनी घाबरून जावू नये. कोरोना रूग्‍णांची अंत्‍यविधी करणे आपले कर्तव्‍य आहे या मानव भावनेतून आपण केडगांव अमरधाम, रेल्‍वे स्‍टेशन अमरधाम , नागापूर अमरधाम येथे सुविधा उपलब्‍ध करून देणार असल्‍याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

      कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर नगर शहरातील नालेगांव येथील अमरधामची पाहणी करताना मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे, भाजपा शहर जिल्‍हाध्‍यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे, सभागृह नेते मा.श्री.रविंद्र बारस्‍कर, मा.श्री.अजय चितळे, मा.श्री.बाळासाहेब जगताप,मा.श्री.ऋगवेद गंधे, अमरधाम येथील व्‍यवस्‍थापक श्री.कु-हे  आदी उपस्थित होते.


      मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की, शहरातील नालेगांव अमरधाम स्‍मशानभूमीमध्‍ये दररोज मोठया प्रमाणात कोरोना बाधीत रूग्‍णांचे अंत्‍यविधी होत असल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये घबराट पसरलेली आहे. कोरोना मृत्‍यू झालेल्‍या नागरिकांच्‍या अंत्‍यविधीसाठी मोठी प्रतिक्षा करावी लागत आहे. रूग्‍णवाहिकांच्‍या लागलेल्‍या रांगाचा फोटो ,व्हिडीओ सोशल मिडीयावर व्‍हायरल झाल्‍यामुळे नगर शहरामध्‍ये कोरोनामुळे होणा-या मृत्‍यूचे तांडव नागरिकांमध्‍ये जावून नागरिक भयभित होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पाहणी करून अंत्‍यविधी करण्‍यासाठी नेमणूक केलेल्‍या संस्‍थेच्‍या संचालकाशी चर्चा करून माहिती घेतली. यामध्‍ये मोठया प्रमाणात वयोवृध्‍द नागरिकांचा दुदैवी मृत्‍यू झाला आहे. याच बरोबर जिल्‍हयासह इतर जिल्‍हयातील कोरोना रूग्‍णांचा समावेश आहे. यासाठी प्रत्‍येक नागरिकांनी आपआपली काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने दिलेल्‍या नियमाचे पालन करून कोरोनावर मात करण्‍यासाठी सहकार्य करावे अत्‍यावश्‍यक काम असल्‍यासच घराबाहेर पडावे, विनाकारण शहरामध्‍ये फिरून निष्‍पाप नागरिकांना कोरोनाची लागण होईल असे वर्तण करू नये  असे ते म्‍हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post