...तर १५ दिवस किंवा तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अटळ : राजेश टोपे

 

...तर १५ दिवस किंवा तीन आठवड्यांचा लॉकडाऊन अटळ : राजेश टोपेमुंबई: राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही स्थिती सुधारली नाही तर महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करेल, असे अगदी स्पष्ट शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही कठोर निर्बंध लागू केले आहेत. यातून आम्ही करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरू असे आजतरी मला वाटत आहे. मात्र, ही स्थिती सुधारली नाही. रुग्णवाढ कायम राहिली. वैद्यकीय सुविधा आणि औषधे अपुरी पडू लागली तर मात्र सरकारला कडक लॉकडाऊनचे पाऊल उचलावे लागेल. त्या स्थितीत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी आम्हाला १५ दिवस ते तीन आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल, असे टोपे म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post