शेतकर्यांची चिंता वाढणार... राज्यावर अवकाळी पावसाचे ढग
मुंबई: राज्यात काही दिवसांपूर्वी विविध भागांत काही दिवसांपूर्वी तापमानात घट होऊन अवकाळी पाऊस पडला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी ही पर्जन्यवृष्टी होईल असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.
तसेच पश्चिम बंगाल आणि झारखंड आदी राज्यांमध्ये हवेची स्थिती काहीशी चक्रीय पद्धतीची पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील पर्यावरणात बदल होण्याची चिन्हे आहेत. पुढच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात ढगांची दाटी पाहायला मिळू शकते.असेही पुणे वेध शाळेने सांगितले आहे.
Post a Comment