वीज कंपनीतील महिला टेक्निशियन १० हजारांची लाच स्वीकारताना 'एसीबी'च्या जाळ्यात

 वीज कंपनीतील महिला टेक्निशियन १० हजारांची लाच स्वीकारताना 'एसीबी'च्या जाळ्यातजळगाव : घरगुती मीटर कमर्शियल न करण्यासाठी दोन वेळा पंधरा हजाराची लाच घेतल्यानंतरही तक्रारदाराकडून पुन्हा १० हजारांची लाच स्वीकारताना  वीज वितरण कंपनीच्या शोभना दिलीप कहाणे (वय ५६, रा.पवन नगर, ममुराबाद रोड, जळगाव) या महिला टेक्निशियनला  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेतीन वाजता रंगेहात पकडले. 

 शहरातील एका ग्राहकाकडे चार भाडेकरु आहेत. त्याचे मीटर एकच आहे. भाडेकरु असल्याने मीटर व्यावसायिक करावे व त्यासाठी दंड आकारला जाईल असे सांगून महावितरणच्या सीनियर टेक्निशन शोभना कहाणे यांनी कारवाई टाळण्यासाठी ग्राहकाकडे सुरुवातीला दहा हजाराची मागणी केली. या ग्राहकाने त्याची पूर्तता केली. त्यानंतरही कहाणे यांनी पुन्हा पाच हजार रुपयाची मागणी केली. या ग्राहकाने कटकट नको म्हणून पुन्हा पाच हजार रुपये दिले. त्यानंतरही कहाणे यांचा पैशाचा मोह कमी झाला नाही, त्यांनी या ग्राहकाकडे पुन्हा दहा हजार रुपये द्यावे लागतील नाही तर दंड आकाररु असा दम भरला. त्यामुळे या ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जीएम ठाकूर यांची भेट घेत तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक ठाकूर यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता निरीक्षक निलेश लोधी,दिनेशसिंग पाटील, अशोक अहिरे,सुनील पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे,महिला पोलीस अमलदार शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ,जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील,नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने दीक्षितवाडीतील कार्यालयात सापळा लावला. ठरलेल्या नियोजनानुसार दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच शोभना कहाणे यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post