खा.उदयनराजे भोसलेंनी भीक मांगो आंदोलनातून जमवलेले पैसे जिल्हाधिकार्यांनी परत पाठवले

 

खा.उदयनराजे भोसलेंनी भीक मांगो आंदोलनातून जमवलेले पैसे जिल्हाधिकार्यांनी परत पाठवलेसातारा: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी भीक मांगो आंदोलनाच्या माध्यमातून गोळा करुन दिलेले पैसे सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परत केले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनीऑर्डर करुन उदयनराजे भोसले यांना 450 रुपये परत केले. 

उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर लॉकडाऊनविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले होते. त्यावेळी उदयनराजे तेथील फुटपाथवर कटोरा घेऊन बसले होते. यावेळी लोकांनी त्यांच्या कटोऱ्यात पैसे टाकले होते. ही एकूण रक्कम 450 रुपये इतकी होती. हे पैसे उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post