व्यापक लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

 लसीकरणासाठी राज्याकडून ग्लोबल टेंडर- अजित पवारसध्या देशात ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा मोदीकडे ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबतीत मागणी केली आहे. तसेच ऑक्सिजनची वाहतूक हावाईमार्गे करण्यासाठी परवानगी द्यावी असेसुद्धा ठाकरे यांनी मागणी केली मात्र, मात्र ही मागणी 50 टक्के मान्य करण्यात आली. रिकामे ऑक्सिजनचे टँकर हवाईमार्गे नेण्याची परवानगी केंद्राने दिली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


आम्ही काही निर्णय लाँगटर्मचा विचार करुन घेत आहेत. विशेषत: 18 ते 44 वयोमानामध्ये लस देण्याची जबाबदारी राज्याने उचलावी असे मत केंद्राचे आहे. तस सर्व राज्य ही जबादारी केंद्राने उचलावी असे सर्व राज्य म्हणत आहेत. मात्र, टोलवाटोलवी करुन चालणार नाही. त्यासाठी आम्ही ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल टेंडरसाठी पाच जाणांची समिती नेमली आहे. यामध्ये राज्य सरकारचे मुख्य सचिव हे अध्यक्ष असतील. वित्त विभागाचे मुख्य सचिव, सार्वजिनक विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आणि उद्योग विभागाचे सचिव हे या समितीचे सदस्य असतील. यामध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक सर्व लसींचा या ग्लोबल टेंडरमध्ये उल्लेख करावा असंसुद्धा मुख्य सचिवांना सांगितलं आहे, असं अजित पवार यांनी माहिती दिलीआहे. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि लस मग ती सीरम असो, भारत बायोटेक असो, फायजर असो, ज्या कोणत्या असतील त्या सर्वांचा उल्लेख ग्लोबल टेंडरमध्ये असेल.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरु करण्याची तयारी आपण केली आहे. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तसं आहे, अशी माहितीसुद्धा अजित पवार यांनी दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post