एलआयसी पॉलिसीधारकांसाठी महत्वाची बातमी... आता पेटीएम द्वारेही भरणा शक्य

 

एलआयसी पॉलिसीधारकांसाठी महत्वाची बातमी... आता पेटीएमद्वारेही भरणा शक्यनवी दिल्ली :   भारतीय जीवन विमा महामंडळाची कोणतीही पॉलिस असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. पॉलिसीच्या प्रीमियमचा भरणा आता तुम्हाला Paytm च्या माध्यमातून करता येणार आहे. LIC ने Paytm ला आपल्या सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंट सेवा देण्यासाठी नियुक्त केले आहे. LIC ने  Paytm शी तसा करार केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार 17 गेटवेने LIC च्या डिजिटल पेमेंट सुविधेसाठी बोली लावली होती.  Paytm च्या बहुस्तरिय पेमेंट सेवेने यात बाजी मारली. 


Paytm च्या काही सेवा LIC साठी उत्तम होत्या.  दोघांमधील करारामुळे पेमेंट प्रक्रिया सोपी होणार आहे. पेमेंट करण्याचे जास्त पर्याय पॉलिसीधारकांसाठी उपलब्ध असतील.LIC चे पेमेंट पॉलिसधारकांना GooglePay, PhonePe ने सुद्धा करता येऊ शकते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post