कृषी नियोजनात आता शेतकर्यांचा सहभाग, राज्यात प्रथमच ग्राम कृषी विकास समिती स्थापन

कृषी नियोजनात आता शेतकर्यांचा सहभाग, राज्यात प्रथमच ग्राम कृषी विकास समिती स्थापन मुंबई दि 9 : कृषी क्षेत्रातील नियोजनामध्ये गाव पातळीवरील शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यात प्रथमच ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी, गावातील प्रगतशील शेतकरी व कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहिती कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी दिली.

येत्या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कृषिमंत्री  श्री. भुसे म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात मोहिम स्वरूपात जमीन सुपीकता निर्देशांकाचे फलक बसविण्यात आले असून त्या आधारे रासायनिक खतांच्या वापरामध्ये 10% बचत करावी. तालुक्यातील उत्पादकता ही त्या तालुक्यामधील सर्वोत्कृष्ट उत्पादकता असणाऱ्या शेतकऱ्याइतकी करणे व वर्ष 2020-21 मध्ये कृषी विभागाचे प्राधान्याने कार्यक्रम राबविणे बाबत त्यांनी सविस्तर माहिती घेतली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post