दुष्काळात तेरावा...डाळींबाच्या बागेस आग लागून मोठे नुकसान

 डाळींबाच्या बागेस आग लागून जळुन मोठे नुकसान, उभ्या फळबागेचे नुकसाभरपाईची अपेक्षाखर्डा :येथील शेतकऱ्याचे डाळिंबाच्या बागेला रात्री अचानक आग लागून बागेचे नुकसान झाले.

     याबाबत खर्डा भूम रस्त्यावरील शौकत शब्बीर शेख यांच्या डाळिंबाच्या बागेला रात्री अचानक आग लागून डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले तसेच पिकासाठी केलेल्या ठिबक सिंचनचे पाईप जळून  नुकसान झाले. शौकत शेख या शेतकऱ्याने मोठ्या आशेने डाळिंबाचे पीक अडीच एकर शेतीमध्ये ठिबक सिंचन वर केले होते. परंतु रात्री अचानक आग लागल्याने फळ बागेचे नुकसान होऊन आगीमध्ये  डाळिंबाच्या फळबागेचे नुकसान झाले. यावेळी खड्याचे कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी केलेल्या जळीत फळबागेच्या  केलेल्या पंचनाम्यात सुमारे ४ लाख ५८ हजार  नुकसान झालेचे पंचनामा केला. डाळींबाचा फळ बागेत ठिबकचे सिंचनही जळून खाक झाली.

     नुकताच रमजान महिना चालू झाल्यामुळे मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली होती. परंतु अचानक झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या उत्पन्नाच्या आशेवर आगीमुळे पाणी फिरले. या शेतकऱ्याने बँकेचे कर्ज काढून फळबाग लागवड करून जगवली होती अशी माहिती शेतकऱ्याने दिली.परंतु लागलेल्या आगीच्या संकटामुळे बहरलेली डाळिंब बाग लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या आर्थिक उत्पन्नाचे स्वप्न भंगले. रात्री लागलेल्या आगीमुळे जवळील पेट्रोल पंपावरील नागरिकांनी शेतकरी शौकत शेख यांना रात्रीच कळवले शौकत शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात न आल्याने डाळिंब बागेचे मोठे नुकसान झाले. शासकीय पंचनामा कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी केला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. फळ बागेसह ठिबकच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाई मिळावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शौकत शेख या शेतकऱ्याकडून करण्यात आली.

प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post