नगरबाहेरील कोविड मयतांचे अंत्यसंस्कार अमरधाममध्येच करावे, शहरातील व बाहेरील संघर्ष टाळावा

 नगरबाहेरील कोविड मयतांचे अंत्यसंस्कार नगर शहरातच करावे, शहरातील व बाहेरील संघर्ष टाळावा नगर - नगर शहरात कोविडमुळे सुमारे 55 ते 60 व्यक्तीचे मृत्यू होत असून झाले. इथून मागे आपण कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंतीमसंस्कार महानगरपालिके मार्फत नगर येथील अमरधाम येथे करत आलो.परंतु काल अचानक नगर शहराबाहेरील नागरिकांचे अंतीमसंस्कार थांबवण्यात आल्याचे समजले .नगर शहराबाहेरील नागरिकांचे अंतीमसंस्कार कुणाच्या आदेशामुळे थांबविण्यात आले,की असे कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश कुणी सिव्हिल हॉस्पिटल अथवा महानगरपालिकेला दिले काय ? की असे अंतीमसंस्कार करू नये म्हणून कुणी निवेदन अथवा दबाव आणला काय ? असे माणुसकीचे दुश्मन नक्की कोण होते ? प्रशासन की इतर कुणी असा सवाल जिल्हा  परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, वास्तवात ह्या विलंबाबाबत मला शेंडी,भातोडी, रस्तापुर व इतर अनेक ठिकाणावरून मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचे फोन आले. एक तर कोविड झालेल्या रुग्णांना बेड मिळणे, बिल भरणे,आशा अनेक अवघड बाबी पार पाडत उपचार करतात. परंतु दुर्दैवाने रुग्ण मृत्यू नंतरही असे अतोनात हाल होणार असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे .अंतीमसंस्कार केल्याने त्या भागात थोडेफार प्रदूषण होणार परंतु प्रदूषण काय फक्त ह्याच बाबीमुळे होते काय. इतर बाबी काहीच नाहीत काय,सीना नदीचे घाण पाणी,नाल्यामध्ये येणारे रक्ताचे पाणी,कचरा,ह्या बाबीही खूप आहेत वास्तविक अंतीमसंस्कार सुरू ठेवूनही उपाय योजना करता येतात,जास्त ठिकाणी आपण ती व्यवस्था काशी निर्माण करू शकतो यावर विचार करून निर्णय घेता आला असता परंतु कालचा प्रकार मृत पावलेल्या नगर शहराबाहेरील लोंकांच्या दृष्टीने घृणास्पद झाला,माणुसकीचे दुश्मन असल्या सारखा वाटला प्रशासन तातडीने निर्णय घेऊ शकते त्यांनी तो घ्यावा नक्कीच सर्व ह्या बाबतीत सहकार्य करतील. कुणाचीही ह्या बाबतीत विरोध असण्याचे कारण नाही कारण ज्याला माणुसकी आहे तो विरोध करणारही नाही प्रशासनाने मात्र खंबीरपणे भूमिका घेऊन निर्णय घ्यावेत व मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची व त्या व्यक्तीची मरणानंतर सुटका करावी हि विनंती.यानंतर नगर शहर व बाहेरील असा संघर्ष होणार नाही याची काळजी घ्यावी हि सर्व नागरिकांच्या वतीने नम्र विनंती 

                        

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post