राज्यातील आणखी एक मंत्री अडचणीत! भाजप नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन, राहुरीचा बिहार झालाय..

 

पत्रकाराच्या खूनप्रकरणी सखोल चौकशी करावी

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदनअहमदनगर -राहुरी येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणांतील मुख्य सुत्रधारांचा तपास कराव आरोपीनां कठोर शासन करावे अशी मागणी भाजपाचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे केली आहे‌ दरम्यान या घटनेने संदर्भामध्ये राज्याचे  मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीका करून या घटनेमध्ये जे जे कुणी सामील आहे त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली.निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांचे दिनांक ०६ एप्रिल रोजी राहुरी येथील मल्हारवाडी रोड वरुन दिवसा ढवळया अपहरण करण्यात आले व त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात येऊन त्यांचा मृतदेह शहरातील कॉलेजरोड परिसरात आणून टाकण्यात आला. मयत दातीर यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी देणे, हल्ला करणे असे प्रकार घडले होते या बाबत दातीर यांनी राहुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती तसेच आपल्या जीवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी हि केली होती. राहुरी शहरा लगतच्या 18 एकर भूखंडाच्या उताऱ्यावर ज्यांची ज्यांची नावे आहे त्यांच्यावर कलम 302 चा गुन्हा दाखल करावा. तनपुरे कुटुंब हे नगरपालिकेच्या माध्यमातून जागांवर आरक्षण टाकून जागा बळकावण्याचे काम करत आहे. व त्यानंतर केले जाते सरकारच्या माध्यमातून आरक्षण उठवण्याचे काम केले जाते मुख्य आरोपी कान्हू मोरे याला अटक करून तपास करावा जेणेकरून या कटामागे असलेल्या सूत्रधार याचा छडा लागण्यास मदत होईल, माझ्या आमदार की च्या काळामध्ये 10 वर्षात कधीही गुन्हेगारांना पाठीशी घातले जात नव्हते. आता राहुरीचे बिहार झाले आहे. गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्यामुळे राहुरी तालुक्या मध्ये गुंडांचा वावर वाढला आहे.राहुरी तालुक्याच्या इतिहासात बिहार राज्याला लाजवेल अशा प्रकारची सदर घटना आहे. गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांची सामान्य नागरिकांवर दहक्षत निर्माण झाली आहे. पोलिसांचा व कायदयाचा धाक राहिलेला दिसत नाही मयत पत्रकार दातीर यांनी राहुरी शहरातील महत्वाच्या ठिकाणी असलेल्या १८ एकर क्षेत्राच्या खरेदी विक्री व ताब्या बाबत वेळोवेळी उपोषण तक्रार अर्ज बातम्या आदिच्या माध्यमातुन पाठपुरावा केलेला होता. या गुन्हयातील संशयित आरोपी नामे कान्हु गंगाराम मोरे या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मोठे राजकीय पाठबळ असल्याची शक्यता असून यापूर्वी संशयित आरोपी कान्हू मोरे याच्यावर 302 सारखे गंभीर गुन्हयांची नोंद आहे घटना घडण्यापुर्वी काही दिवस आरोपी कोणाच्या संपर्कात होते, संबधित खुनाचा कट कसा शिजला याबाबत संशयित आरोपीच्या मोबाईलचे सीडीआर तपासले जावेत तसेच मोबाईलचे लोकेशन तपासावे. अपहरण झाले त्यावेळी घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे. या प्रकरणी दातीर यांनी मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात वेगवेगळया याचिका दाखल केलेल्या आहेत. त्याबाबत चौकशी व्हावी व वादग्रस्त १८ एकर क्षेत्रावरील मालकी हक्क असणा-या संबधित व्यक्तींनी संघटीत होवुन रोहीदास दातीर यांची हत्या केली आहे, त्यामुळे त्यांनाही आरोपी करण्यात यावे. याबाबत महत्वाचे पुरावे व कागदपत्र उपलब्ध असून तपास कामी मागणी केल्यास सादर करण्यात येतील. या गुन्ह्यातील सहभागी असलेल्या सर्वाचा मुळाशी जाऊन तपास करावा. सर्व आरोपीना अटक करावी व त्यांना कठोर शासन व्हावे अन्यथा तीव्र स्वरूपांचे आदोलन करण्यात येईल यांची नोद घ्यावी हि विनंती.तसेच घटनेचा तपास पुर्ण होई पर्यंत दहशतीखाली असणा-या मयत दातीर यांच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे.असे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना त्यांनी दिले यावेळी शरद बाचकर, नानासाहेब जुधारे, अनिल दौंड, आरिफ बागवान, गणेश खैरे, बाबासाहेब शिंदे, नवनाथ कोळसे, बबन कोळसे, अविनाश बाचकर, प्रभाकर हरिष्चंद्रे, शरद उदावंत, नारायण धोंगडे तसेच आदी उपस्थित होते.दरम्यान माजी आमदार कर्डिले यांनी राहुरी येथील ज्या अठरा एकर जागेचा वाद होता त्यास संदर्भामध्ये राहुरी नगरपालिकेने ती जागा हस्तांतरित करून घेतलेली आहे असे प्राथमिक माहिती मिळाली होती त्यानंतर सदरची जागा ची मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाच्या नावाने त्या ठिकाणी एक कंपनी उघडून ती जागा घेतलेली होती सदर जागेच्या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्ते दातीर यांनी वेळोवेळी आवाज उठवून या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळेच बहुधा दातीर यांची हत्या झाली असावी या कथांमध्ये जो सहभागी आहे त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे व त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे कर्डिले यांनी सांगितले. सदरची कंपनीही मंत्री तनपुरे यांच्या मुलाच्या नावाची आहे व देशमुख हा त्यांचा मेहुणा आहे. त्यामुळे या कटामध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांचा छडा लावून त्यांना अटक करावी अशी मागणी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणासंदर्भात मध्ये आम्ही राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा निवेदन देणार असून त्यांना सुद्धा या प्रश्नासंदर्भात लक्ष वेधणार असून निश्चितपणे जातील कुटुंबांना न्याय मिळवून दिला असेही त्यांनी यावेळी सांगितले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post