पुढील अडीच वर्षेही मनपाच्या सत्तेत आमचा सहभाग, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे मोठं वक्तव्य

 पुढील अडीच वर्षही भाजप सत्तेत सहभागी असेल: माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

मनपाचे नूतन सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांनी पदभार स्विकारलानगर-  पदाचा उपयोग हा सर्व सामान्‍य जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी करावा. शासनाच्‍या विविध योजना मनपाच्‍या माध्‍यमातून राबविल्‍या जात असताना त्‍या योजना शेवटच्‍या घटकापर्यत घेवून जाण्‍याचे काम पदाधिकारी करित असतात. सभागृह नेते रविंद्र बारस्‍कर हे कष्‍टाळू ,प्रामाणिकपणा व अभ्‍यासू नेतृत्‍व आहे. ते नक्‍कीच या पदाचा उपयोग सर्व सामान्‍याचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी करतील. माजी सभागृह नेते मनोज दुलम यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ठरल्‍याप्रमाणे शब्‍द पाळला व नगरसेवक बारस्‍कर यांना सभागृह नेते पदाची संधी दिली. पुढील अडीच वर्षातही आम्‍ही मनपाच्‍या सत्‍तेत सहभागी राहू असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

      सभागृह नेते पदाचा पदभार रविंद्र बारस्‍कर यांनी स्विकारला यावेळी सत्‍कार करताना माजी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभागृह नेते मनोज दुलम, संजय ढोणे आदी उपस्थित होते.

      सभागृह नेते रविंद्र बारस्‍कर म्‍हणाले की, भाजप पक्षाच्‍या माध्‍यमातून सभागृह नेते पदाची संधी मिळाली या संधीच्‍या माध्‍यमातून शहरातील विविध प्रलंबित प्रश्‍न प्रामाणिकपणे मार्गी लावण्‍यासाठी प्रयत्‍न करणार आहे. नगर शहरावर कोरोना संसर्ग विषाणूचे महाभयंकर संकट आपल्‍यावर ओढवले आहे. हा संसर्ग कमी करण्‍यासाठी मनपाच्‍या माध्‍यमातून विविध उपाय योजना राबविण्‍यासाठी प्रयत्‍न राहू .  

      यावेळी स्‍थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, उदय कराळे, विलास ताठे, .ऋगवेद गंधे, धनंजय गाडे, विठ्ठल बारस्‍कर  महादेव बारस्‍कर, अशोकराव वाकळे,भाऊ बारस्‍कर, . .साहिल वाकळे, बाळासाहेब बारस्‍कर, प्रकाश गोसावी, पुष्‍कर कुलकर्णी , बाबासाहेब भिंगारदिवे, अमोल गायकवाड, अखिल शेख,  महेश कराळे, बाळासाहेब वाकळे, अविनाश कर्पे, गणेश वाकळे, किसन भिंगारदिवे, यांनी भेट घेवून शुभेच्‍छा दिल्‍या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post