जनता कर्फ्युसाठी सुधारित आदेश जारी, किराणासह आवश्यक सेवा ठराविक वेळेतच खुल्या राहणार

  

जनता कर्फ्युसाठी सुधारित आदेश जारी, किराणासह आवश्यक सेवा ठराविक वेळेतच खुल्या राहणार




नगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यानुसार नव्याने आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार 1 मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा दूध डेअरी, किराणा दुकान, पेट्रोल पंप सकाळी 7 ते 11 या दरम्यान सुरू राहतील. इतर वेळेस सर्व दुकाने, कार्यालय, भाजीपाला बाजार बंद राहतील. 🔸हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलेवरी चालू राहील 🔸धार्मिक स्थळे पुर्णतः बंद राहतील 🔸आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील 🔸भाजीपाला / फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील. 🔸दारु दुकाने पूर्णतः बंद राहतील 🔸टैक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील. चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील. 🔸दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील. 🔸सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील 🔸कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पुर्णतः बंद राहतील 🔸शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील 🔸स्टेडिअम, मैदाने पूर्णतः बंद राहतील 🔸विवाह समारंभास बंदी राहील. 🔸चहाची टपरी /दुकाने पूर्णतः बंद राहतील 🔸अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील 🔸सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह, संग्रहालय पूर्णतः बंद राहतील सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील 🔸सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील 🔸सेतू ई-सेवा केंद्रे, आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील 🔸व्यायाम शाळा, स्विमींग पुल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग इव्हीनिंग वॉक पुर्णतः बंद राहील. बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post