जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने ७० कुटुंबांना महिनाभराचा किराणा

 

आताच्या काळात रूग्णांइतकीच इतर गरजूंनाही मदतीची गरज : प्रसन्न खाजगीवाले

जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने ७० कुटुंबांना महिनाभराचा किराणानगर : आताच्या करोना काळात पुन्हा लॉकडाऊन लागला आहे. सध्या रूग्णांइतकीच इतर गरजूंनाही मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. जैन वात्सल्य संस्था अविरतपणे असा मदतीचा हात देत लाखमोलाचे आशिर्वाद मिळवत आहे. अशा कार्याला समाजातून जास्तीत जास्त हातभार लावला पाहिजे. रोटरी मार्फत आम्ही कोविड केअर सेंटर सुरू केले आहे तसेच अमरधाममध्ये कोविड मयतांवर अंत्यसंस्कार करणार्या कर्मचाऱ्यांना पीपीई किटची मदत केली आहे, असे प्रतिपादन रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले यांनी केले.
जैन ओसवाल वात्सल्य संस्थेच्या वतीने दरमहाच्या उपक्रमांतर्गत समाजातील ७० गरजूंना किराणा मालाची मदत करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात  ही मदत देण्यात आली. इतरांना घरपोच किराणा पाठवण्यात आला.
यावेळी रोटरी सेंट्रलचे सेक्रेटरी तथा सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे अध्यक्ष ईश्वर बोरा, खजिनदार धिरज मुनोत, किशोर गुगळे, श्लोक गुगळे, लक्ष कोठारी, श्रीकांत तुरे, संस्थेचे  अध्यक्ष अजित बोरा, सेक्रेटरी विजय गुगळे, मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष नंदलाल कोठारी,  विक्रम मुथा, शशांक चव्हाण, महेश गुगळे, नूतन गांधी आदी उपस्थित होते. मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष नंदलाल कोठारी यांच्या शोभानंद निवासस्थानी सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित बोरा, सौरभ बोरा, प्रमिलाताई बोरा, सी.ए. रमेशजी फिरोदिया, सविता रमेश फिरोदिया, अशोक (बाबुशेठ) बोरा, राजेंद्र चोपडा, पनालाल बोगावत, अजय बोरा, अतुल बोरा, अभय श्रीश्रीमाळ, सतिष मुथा, किशोर गुगळे, नंदलाल कोठारी, किशोर पितळे आदींनी सहयोग दिला.
ईश्वर बोरा म्हणाले की, गरजूंना मदत करणं ही आपली संस्कृती आहे. सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांनी याच उद्देशाने ही संस्था चालवली. तोच वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. सदर उपक्रम सातत्याने राबवण्यात अनेकांचे मोलाचं सहकार्य लाभते. सध्या रोटरी मार्फतही सामाजिक बांधिलकी जपत कोविड रुग्णांना मदत करण्यात येत आहे.
विजय गुगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post