नगरकरांना दिलासा...'या' संस्थेने सुरू केले 100 बेडचे कोविड सेंटर

 श्री बडी साजन ओस्तवाल व श्रीसंघ मंगल कार्यालयात कोविड सेंटरचा प्रारंभ

नगरकर नेहमीच संकटकाळात मदतीला धावून येतात : आ. संग्राम जगातपनगर : कोरोना संसर्ग विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रभर उद्रेक झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या संकट काळामध्ये प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोनातून मदतीची भावना दाखविली पहिजे. श्री बडीसाजन ओस्तवाल व श्रीसंघ मंगल कार्यालय यांनी गेल्या १ वर्षापासून सामाजिक भावनेतून मदत करण्याचे काम केले आहे. नगरकर नेहमीच संकट काळामध्ये मदतीला धावून येत असतात. नगर शहरामध्ये जिल्ह्यासह इतरजिल्ह्यातून कोरोनाचे  रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. त्यांना आरोग्य सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे, हे समजून प्रत्येकाने सेवा द्यावी,असे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.


श्री बडी साजन ओस्तवाल व श्रीसंघ मंगल कार्यालय यांच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, संस्थेचे उपाध्यक्ष सुमतीलाल कोठारी, सेक्रेटरी विशाल शेटीया, खजिनदार मिलिंद जांगडा, सहसेक्रेटरी अनिल लुंकड, संचालक धरमचंद कोठारी, अजित कर्नावट, दीपक बोथरा, नरेंद्र चोरडिया, रमन देसर्डा, जैन ओसवाल क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व सल्लागार सुनील भंडारी, राजेंद्र ताथेड आदी उपस्थित होते.

यावेळी सुमतीलाल कोठारी म्हणाले की, श्री बडीसाजन ओस्तवाल संस्थेच्यावतीने अत्याधुनिक १०0 बेडचे कोविड सेंटर सुरु केले आहे.
भविष्यकाळात गरज पडल्यास २00 बेडचेही कोविड सेंटर सुरू करू. या कोविड सेंटरमध्ये एम.डी. फिजिशियन असणाऱ्या डॉक्टरांची व नर्सची सुविधा उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना विशाल शेटीया म्हणाले की, रुग्णांना धीर देण्यासाठी हे कोविड सेंटर घरगुती वातावरणासारखे आहे. या ठिकाणी प्रत्येक रुममध्ये टी.व्ही., खेळाचे साहित्य तसेच वर्तमानपत्रे व घरगुती साहित्याचे कीट देण्यात येणार आहे. या ठिकाणी चांगल्या दर्जाचा शाकाहारी पद्धतीचे जेेेवण दिले जाणार आहे. तसेच नाष्टा, चहा-पाणी, दूधही देण्यात येणार आहे. हे कोविड सेंटर सर्वधर्मीयांसाठी उपलब्ध आहे, असे ते म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post