जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी पासची आवश्यकता नाही, मात्र ठोस कारण द्यावे लागेल

 

जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी पासची आवश्यकता नाही, मात्र ठोस कारण द्यावे लागेल



मुंबई: राज्य सरकारने १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मात्र या कालावधीत एका जिल्ह््यातून अन्य जिल्ह््यात प्रवास करण्यासाठी पासची आवश्यकता नाही. मात्र प्रवास करण्याचे वैध कारण प्रवाशांकडे हवे, अशी माहिती बुधवारी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत पोलिसांच्या ई-पासशिवाय राज्यांतर्गत, राज्याबाहेरील प्रवास करता येत नसे. यंदा राज्य सरकारला ई-पास पद्धत लागू न करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. सरकारने ती मान्य केल्याचे पांडे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post