सलग दुसऱ्या दिवशी देशात रुग्णवाढीचा जागतिक उच्चांक

 सलग दुसऱ्या दिवशी देशात रुग्णवाढीचा जागतिक उच्चांकनवी दिल्ली :  देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रोज नवीन विक्रम होत असून गुरुवारी 3.32 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 2263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताने रोजच्या कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत आता अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. गुरुवारची कोरोना रुग्णसंख्या ही जगातील कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीचा एक विक्रम आहे. गुरुवारी देशात 1,93,279 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्या आधी बुधवारी देशात 314,835 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 2104 रुग्णांनी जीव गमावला होता.

देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे देशातल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post