उद्योजक अपहरण प्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

उद्योजक अपहरण प्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षानगर :  शहरातील प्रसिद्ध उद्योजक करीम भाई हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणातील आरोपी अजहर मंजुर शेख, निहाल बाबा मुशरफ शेख यांना जन्मठेप व 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक कुमार भिलारे यांनी हा निकाल दिला.

शहरातील कोठला परिसरातून करीम हुंडेकरी यांचे अपहरण झाले होते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा पोलिसांनी हुंडेकरी यांची काही तासांमध्ये सुखरूप सुटका केली होती. यानंतर आरोपी अजहर शेख व निहाल शेख यांना पोलिसांनी अटक केली होती.

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन अप्पर अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखान्याचे सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी करून न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात अ‍ॅड. ए. बी. पवार यांनी सरकारी पक्षाची बाजी मांडली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post