घरपोच दारूचा निर्णय त्वरित मागे घ्या....

घरपोच दारूचा निर्णय त्वरित मागे घ्या.... नगर: ऑक्सिजन पोहोचला नाही तरी चालेल, रेमडेसीवीर पोहोचले नाही तरी चालेल पण दारू घरपोच पोहोचली पाहीजे. दारू व इतर व्यसनाने प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने करोना काळात अंमली पदार्थावर अंकुश लावा पण इथे सरकार घरपोच दारू पाठवते आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी दारूबंदी आंदोलनाचे कार्यकर्ते व साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तसेच, 'आज लॉकडाऊनमध्ये कामगार वर्ग घरी आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने आर्थिक उत्पन्न घटले आहेत. अशा वेळी हा नको असलेला अनावश्यक खर्च कुटुंबाचा तुम्ही का वाढवता? मागील वर्षी दारूची दुकाने सुरू केल्यावर महिलांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेण्याच्या घटना घडल्या होत्या. हे विचारात घेऊन किमान कुटुंबाची बचत कायम राहण्यासाठी तरी हा निर्णय सरकारने मागे घ्यावा अशी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची सरकारला विनंती आहे. बाहेर दारू पिणारे वडील घरात लहान मुलांसमोर दारू पित बसणार यात मुलांवर होणारा परिणाम सरकार विचारात घेणार आहे का...?' असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post