हेल्थ इन्शुरन्स कंपन्या प्रिमियम वाढवण्याच्या तयारीत

 

करोनामुळे हेल्थ इन्शुरन्स कंपन्या प्रिमियम वाढवण्याच्या तयारीत
नवी दिल्ली, : कोरोनाने सामान्यांचे आर्थिक  कंबरडं मोडलं आहे.त्यात आता या मध्यवर्गीय माणसाला आणखी एक आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. भारतात सध्या कोरोना महासाथीची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे विविध विमा कंपन्यांकडे कोरोनासंबंधी 15 हजार कोटी क्लेम आले आहेत. त्यामुळे भविष्यात कोरोना आजार राहणार हे लक्षात घेऊन विमा कंपन्या आरोग्य विम्याचा प्रीमियम वाढवू शकतात. या कंपन्यांनी त्याबद्दल पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

कोरोनामुळे इन्शुरन्स कंपन्यांकडे आलेले क्लेम मोठ्या प्रमाणात वाढले असूनही कंपन्यांनी प्रीमियम वाढवलेले नाहीत त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड आर्थिक ताण आहे. विविध विमा कंपन्यांनी एकत्रितपणे विमा नियामक IRDAI कडे आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये 10 टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. कोविड-19 महामारी आल्यानंतर कंपन्यांकडे येणाऱ्या क्लेममध्ये प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे आरोग्य विम्यामध्ये कोविड 19 सेस म्हणून वाढीव 10 टक्के रक्कम आकारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी या कंपन्यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post