लस पुरवठा करताना केंद्राचे गुजरातला झुकते माप, सर्वाधिक रूग्ण असूनही महाराष्ट्राला कमी पुरवठा
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होणे गरजेचं आहे. अशात आज राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे लसींच्या पुरवठ्या संदर्भात केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.
गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रच्या जवळपास निम्मी आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्याही देशात सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पाठोपाठ सर्वाधिक डोस गुजरातला देण्यात आले आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत 77 लाख, राजस्थान 74 लाख, उत्तर प्रदेश 73 लाख, पश्चिम बंगाल 66 लाख, कर्नाटक 49 लाख, मध्य प्रदेश 45 लाख, केरळ 40 लाख डोस असे काही प्रमुख राज्यातील प्रमाण आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक 82 लाख लसींचे डोस देण्यात आले आहे. मात्र, लोकसंख्या आणि कोरोना संक्रमित रुग्णसंख्येची तुलना केल्यास त्या प्रमाणात महाराष्ट्राला लसींचा पुरवठा होत नसल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
Post a Comment