भाजपला धक्का... सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाची 'एनडीए'ला सोडचिठ्ठी

 

भाजपला धक्का... गोव्यात सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाची एनडीएला सोडचिठ्ठीपणजी: गोव्यातील भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीने भाजप प्रणित NDA ची साथ सोडली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएचे अध्यक्ष अमित शाह यांना पत्र लिहून हे जाहीर केलं आहे. त्यामुळं 2021 मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोवा भाजपला हा मोठा झटका समजला जात आहे.

 प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातील गोवा सरकारचे अनेक निर्णय हे अँन्टी गोवा धोरणाला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे. हा प्रकार म्हणजे गोव्याच्या जनतेबरोबर केलेला अविश्वास आहे. सरकार फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोपही विजय सरदेसाई यांनी लावला आहे. सरदेसाई यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही भाजपवर टीका केली आहे. भाजप सरकार पूर्णपणे भ्रष्टाचारात अडकलेलं असून जराही प्रामाणिकपणा शिल्लक नसल्याचं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post