अनैतिक संबंधातुन खून, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व २२ हजारांचा दंड

 अनैतिक संबंधातुन बापुसाहेब घनवट याचा खुन केल्याप्रकरणी आरोपींना जन्मठेप व एकुण २२हजार रुपये दंडाची शिक्षाअहमदनगर : आरोपी कृष्णा पुनमसिंग भोंड (मयत), परमेश्वर पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे, (रा.रामनगर शेवगाव, ता.शेवगाव जि. अहमदनगर) यांनी बापुसाहेब घनवट यास जीवे ठार मारल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी सर्व आरोपींना भा.द.वि.का.कलम ३०२, २०१, ५०६ सह ३४ अन्वये दोषी धरून आरोपी क्र. २ व ३ यांना जन्मठेप व प्रत्येकी ११ हजार-रूपये दंड व दंड न भरल्यास ७ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, दि.०७/०८/२०१९ रोजी शेवगाव-पाथर्डी रोडवरील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयासमोर असलेल्या जामा मश्जिद ट्रस्टच्या मोकळ्या जागेवर राहत असलेली वनिता यशवंत मुळेकर हिचे पालावर मयत बापुसाहेब घनवटरात्री १०:३० सुमारास गेला असता त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले आरोपी परमेश्वर पुनमसिंग भोंड, कृष्णा पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे यांनी बापुसाहेब घनवट याचे वनिता मुळेकर हिचेशी अनैतिक संबंध असल्याचे संशयावरून त्याला मारहाण करून, त्याचे तोंड दाबुन झोपडीपाठीमागील गवतात ओढत घेवुन जावुन मोठया लोखंडी खिळयाने चेह-यावर वार करून ठार मारले. दुस-या दिवशी सकाळी सदर घटनेबाबत मयताचे भाउ काकासाहेब एकनाथ घनववट याने शेवगाव पोलीस स्टेशनला  फिर्याद दाखल केली. 

सदर गुन्हयाचा तपास शेवगाव पोलीसांनी करून तपासामध्ये आरोपीचा सहभाग असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे आरोपींविरूध्द तपास पुर्ण झाल्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरी.सुजित पं.ठाकरे यांनी आरोपींविरूध्द मा.न्यायालयात  दोषारोपत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा.जिल्हा न्यायाधीश क, १ श्री.अशोककुमार भिलारे साहेब यांचे न्यायालयात झाली. केसचा निकाल लागेपावेतो तिन्ही आरोपी जेलमध्येच होते. केसचा निकाल होण्यापुर्वी आरोपी क्र.१ याचा जेलमध्ये आजारी पडुन मृत्यु झाला होता. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण ८साक्षीदार तपासण्यात आले.  न्यायालयासमोर आलेला परिस्थतीजन्य पुरावा व अतिरीक्त

सरकारी वकील अनिल दि.सरोदे यांचा युक्तिवाद ग्राहय धरून मा.न्यायालयाने आरोपींना दोषी धरून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी पो.हे.कॉ.ब.नं.२००१ एम.ए.थोरात यांनी सरोदे यांना खटल्याचे कामी मदत केली


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post