पाथर्डी‌ तालुका हादरला, फुंदेटाकळी येथील एकाची हत्या

 पाथर्डी‌ तालुका हादरला, फुंदेटाकळी येथील एकाची हत्या



नगर- पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी फाटा येथील हाँटेल साई प्रेम समोर लावलेली चारचाकी गाडी काढुन घे, म्हणाल्याचा राग आल्याने सुधीर संभाजी शिरसाट (रा.शिरसाटवाडी) व त्यांचे सात ते आठ साथीदार यांनी लाथा बुक्याने व लोखंडी राँडने मारहान करुन विश्वनाथ कारभारी फुंदे (वय ४१, रा, फुंदेटाकळी फाटा) यांना जखमी केले. त्यानंतर त्यांचे अपहरण करुन पाथर्डी येथे आणुन तेथेही मारहाण केली. फुंदे यांना नातेवाईकांनी दवाखान्यात नेले असता नगरमध्ये त्यांचा शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता मृत्यु झाला. वाळु तस्करीतुन मिळालेल्या पैशाच्या वादातून ही घटना घडली असुन आरोपीला अटक करा, यामधे आरोपींना वाचविण्यासाठी काही वाळु धंद्याला सहकार्य करणारे पोलिस कर्मचा-याची चौकशी करा, अशी मागणी फुंदेटाकाळी येथील ग्रामस्थांनी उपअधिक्षक सुदर्शन मुंडे यांच्याकडे केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post