नगरमध्ये गरजूंसाठी अत्यल्प दरात भोजन देणारे फिरते अन्नछत्रालय सुरू

 

नगरमध्ये गरजूंसाठी अत्यल्प दरात भोजन देणारे फिरते अन्नछत्रालय सुरूनगर :  लॉकडाऊन मुळे हातावर पोट असलेल्यांच्या दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. याशिवाय रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांनाही बराच काळ बाहेर रहावे लागते. या पार्श्वभूमीवर  महावीर जयंतीच्या निमित्ताने उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या पुढाकाराने फिरोदिया ट्रस्ट व आय लव्ह नगर, महावीर प्रतिष्ठानच्या वतीने महावीर जयंती दिनी फिरते अन्नछत्रालय सुरू करण्यात आले आहे. आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याद्वारे    गरजुंसाठी अत्यल्प दरात पौष्टीक भोजन नगरमध्ये उपलब्ध झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post