जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट

 


जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट


नगर :  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भोसले यांनी स्वतःच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकून दिली आहे. 'कोणीतरी माझे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे. याबाबत मी आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. तरी नवीन अकाउंट वरून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्वीकारू नये,' असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी यांनी केले आहे. तसेच संबंधित अकाउंट वरून काही संदेश आला तर त्याची माहिती द्या, असे सांगतानाच संबंधित बनावट अकाउंटची लिंक सुद्धा आपल्या पोस्टमध्ये भोसले यांनी टाकली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post