'एक्साईज'ची मोठी कारवाई....विदेशी दारूसह ८७ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त Video

 अहमदनगर-पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई

विदेशी दारूसह ८७ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

 


मा.आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री. कांतीलाल उमाप साहेब,.संचालक (अंमल बजावणी व दक्षता ) रा.उ.शु. महा.राज्य मुंबई श्रीमती. उषा वर्मा मॅडम,मा.विभागीय उपआयुक्त, श्री. प्रसाद सुर्वे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.गणेश पाटील,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर, श्री. संजय सराफ, प्र.उपअधीक्षक, रा.उ.शु.अहमदनगर व श्री. आर.डी.वाजे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, संगमनेर विभाग,श्री. बिराजदार साहेब, निरीक्षक, भरारी पथक क्र.२,पुणे श्री. एन.सी.परते,दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. अहमदनगर, श्री. ए.ई.तातळे, दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु.पुणे, श्री.विकास थोरात, दुय्यम निरीक्षक, भ.प.२ पुणे यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गोवा निर्मीत अवैध मद्याच्या वाहतुकी बाबतच्या खात्रीशीर बातमीवरुन हिवरगाव पावसा टोलनाक्यावर पुणे नाशिक महामार्गावर मोजे हिवरगाव पावसा (ता.संगमनेर जि.अहमदनगर) या ठिकाणी दोन पंचासह सापळा रचुन गोवा राज्यात निर्मीत व विक्रीस असणाऱ्या तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणाऱ्या विदेशी मद्याचे वाहतुक करताना एक दहा टायर टाटा कंपनीचा २५१८ ट्रक  पकडण्यात आला असुन सदर गुन्हयात रॉयल चॅलेंज व्हीस्कीच्या ७५०मी.ली. क्षमतेच्या ७१३७ सिलबंद बाटल्या, आराबेला व्होडकाच्या ७५० मी.ली. क्षमतेच्या २९७सिलबंद बाटल्या,आरबेला व्होडकाच्या १८० मी.ली. च्या ११०४ सिलबंद बाटल्या,किंगफिशर स्ट्राँग बीयर ५०० मी.ली.क्षमतेच्या ५५२ सिलबंद टीन एक इंटेक्स कंपनीचा मोबाईल, इतर साहित्य असे मिळुन एकुण ८६,४७,५२०/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्हयात भारतसिंग बापुलाल प्रजापती( वय-३२ वर्षे, रा.गादियामेर, पोस्ट-दोलाज, खिलचीपुर, जि.राजगड, राज्य – मध्यप्रदेश)यास अटक करण्यात आली असुन इतर आरोपी फरार आहेत.

सदर गुन्हयात श्री. गणेश डी. पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर,श्री.एस.एम.सराफ, उपअधीक्षक, रा.उ.शु. अहमदनगर श्री.आर.डी.वाजे, निरीक्षक, रा.उ.शु.अहमदनगर, श्री.एस.एस.पाडळे, निरीक्षक, रा.उ.शु, अहमदनगर श्री. बिराजदार साहेब,निरीक्षक, रा.उ.शु.पुणे, श्री.ए.जे.यादव, दुय्म निरीक्षक, रा.उ.शु. अहमदनगर श्री.एन.सी.परते,दुय्म निरीक्षक, रा.उ.शु,अहमदनगर ,श्री. पी.एस.कडभाने, दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु.अहमदनगर,श्री. डी. वाय. गोल्नेकर, दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. अहमदनगर, श्री.ए.पी.बडदे, दुय्यम निरीक्षक,रा.उ.शु.अहमदनगर ,श्री.ए.ई.तातळे, दुय्यम निरीक्षक,रा.उ.शु.पुणे, श्री.विकास थोरात,दुय्यमनिरीक्षक, रा.उ.शु पुणे, जवान सर्वश्री. ए.एल.मेंगाळ, टी.आर.शेख, नेहाल उके, दिपक बर्डे,एस.एम.मुजमुले, एस.डी.साठे, बी.जी.थोरात, व्ही.एम.पाटोळे, विजय हरीभाऊ मेहेत्रे, श्रीमती.एस.आर.आकोलकर, यांनी सहभाग नोंदविला.

Video by-विक्रम बनकर0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post