'मातोश्री'च्या अंगणात शिवसेना धक्का... माजी आमदार भाजपत दाखल

 'मातोश्री'च्या अंगणात शिवसेना धक्का... माजी आमदार भाजपत दाखलमुंबई :  महाविकास आघाडी सरकारमधील  दोन मंत्र्यांची विकेट घेतल्यानंतर भाजपने आता शिवसेनेला  आणखी एक धक्का दिला आहे.  शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी सेनेला जय महाराष्ट्र म्हणत भाजपमध्ये  प्रवेश केला आहे.

तृप्ती सावंत यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, नितेश राणे, अतुल भातखळकर आणि इतरही नेते यावेळी उपस्थित होते.

तृप्ती सावंत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. या लढतीत काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी विजयी झाले होते. तृप्ती या शिवसेनेचे माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहे. 2015 मध्ये बाळा सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व  जागेवर तत्कालीन काँग्रेस नेते नारायण राणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post