दहशत निर्माण करणारा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

 

दहशत निर्माण करणारा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंदराहुरी : देवळाली प्रवरा परिसरात बाबासाहेब लक्ष्मण मुसमाडे यांच्या वस्तीवर धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात कैद झाला आहे.

राहुरी कारखान्यावरुन पेपरमिलमार्गे देवळाली प्रवराकडे जाणार्‍या मधल्या रस्त्यावर अनेकांना रात्री-अपरात्री दर्शन  बिबट्याने दर्शन दिले होते. 

शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अक्षय मुसमाडे यांना डरकाळी ऐकू आल्यानंतर हा बिबट्या प्रगतशील शेतकरी बाबासाहेब मुसमाडे यांच्या घराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अडकला असल्याचे लक्षात आले. .

दरम्यान बिबट्या अडकल्याचे बाबासाहेब मुसमाडे यांनी वनविभागाला कळविले त्यानुसार काल रविवारी वनपाल परदेशी, पवन निकम, गोरक्षनाथ मोरे, भाऊसाहेब गाडे, रामदास धनवडे आदींनी भेट देऊन पंचनामा केला. पिंजर्‍यात जेरबंद झालेला बिबट्या डिग्रस नर्सरी येथे नेण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post